स्ट्रोकच्या लक्षणांविषयी ६१ टक्के नागरिक अनभिज्ज्ञ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्ट्रोकच्या लक्षणांविषयी ६१ टक्के नागरिक अनभिज्ज्ञ
स्ट्रोकच्या लक्षणांविषयी ६१ टक्के नागरिक अनभिज्ज्ञ

स्ट्रोकच्या लक्षणांविषयी ६१ टक्के नागरिक अनभिज्ज्ञ

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : ६१ टक्के नागरिक स्ट्रोकबाबतच्या लक्षणांविषयी अनभिज्ज्ञ असून गोल्डन अवर्सबाबत जागरुकता होणे आवश्यक असून योग्य वेळी रुग्णाला उपचार मिळाले, तर स्ट्रोकपासूनही वाचवणे शक्य होणार आहे. मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाने एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये स्ट्रोकबाबत चिंताजनक तथ्ये समोर आली आहेत. २०० नागरिकांमध्ये ऑनलाईन सर्वेक्षणातून सुमारे ६१ टक्के लोकांना स्ट्रोकची लक्षणेच माहितीच नसल्याची बाब समोर आली आहे.
संतुलन गमावणे, दृष्टी धुसर होणे किंवा कमी होणे, हात कमजोर होणे, बोलण्यात अडचणी यांसारखी प्राथमिक लक्षणेही माहिती नाहीत. सामान्य लोकांमध्ये पक्षाघाताबाबत जागरुकतेचा अभाव आहे. स्ट्रोकचा झटका आल्यास आणि गोल्डन अवर्समध्ये उपचार केल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. स्ट्रोकबाबतची चिन्हे ओळखण्यास मदत करण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला.
सल्लागार इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट डॉ. पवन पै म्हणाले, की सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की ६४.४ टक्के लोक विंडो पिरियड (पहिल्या स्ट्रोकच्या ४.५ तास) दरम्यान स्ट्रोकच्या उपचारांबद्दल जागरुक असले तरी सुमारे ६१ टक्के लोकांना स्ट्रोकची लक्षणे माहिती नाहीत. ज्यांना लक्षणे दिसून येतात त्यांना रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. ९५.२ टक्के लोकांना असे वाटते, की वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी केली पाहिजे. शिवाय सुमारे ८२.७ टक्के लोक दरवर्षी त्यांची वार्षिक आरोग्य तपासणी करतात. स्त्री-पुरुष गुणोत्तर ३:१ होते आणि सुमारे २०० सहभागी या सर्वेक्षणाचा भाग होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88260 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top