बुलेट ट्रेन प्रकल्पाची पिछाडी भरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलेट ट्रेन प्रकल्पाची पिछाडी भरू
बुलेट ट्रेन प्रकल्पाची पिछाडी भरू

बुलेट ट्रेन प्रकल्पाची पिछाडी भरू

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ ः अनेकदा विकासापेक्षा राजकारण वरचढ होते. बुलेट ट्रेनच्या बाबतीत गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे निघून गेला आहे. मात्र, लवकरच ही पिछाडी आम्ही भरून काढू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. आजादी का अमृतमहोत्सव - संकल्प सिद्धी या सीआयआयतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र २०३० पूर्वीच एक लाख डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांनी या वेळी राज्याच्या विकासासाठीच्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. अनेकदा राजकारणामुळे विकासकामात अडथळे निर्माण होतात; मात्र तरीही त्यावर मात करून राज्यातील मेट्रो प्रकल्प वेगात आणि वेळेत पूर्ण केले जातील, असे ते म्हणाले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मागे पडला आहे, गुजरातने त्यात आघाडी घेतली; मात्र माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून आता ही पिछाडी लवकरच भरून काढण्यात येईल. साऱ्या देशाला मुंबईशी जोडण्याची क्षमता बुलेट ट्रेनमध्ये असून तिच्यामुळे मोठी व्यवस्था निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षाही खोल आणि मोठे बंदर महाराष्ट्रात तयार करायचे असून त्यातील अडचणी आम्ही दूर करू. हे बंदर झाले की राज्याचे एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होईल, असेही फडणवीस म्हणाले. डहाणू किनारपट्टीवर वाढवण बंदर तयार करण्याचे काम जेएनपीएला सोपवण्यात आले आहे, त्याचाच संदर्भ फडणवीस यांच्या भाषणात होता.

बाहेर गेलेले उद्योग परत आणू!
महाराष्ट्रातून उद्योग दुसऱ्या राज्यात का गेले, याची कारणे शोधून त्यांना येथे परत बोलावून आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिली.

इंधन स्वस्त करणार!
महाग झालेले पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्यासाठी त्यावरील व्हॅट कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू असून, तसे झाल्यावर त्याचा फायदा सर्वांना होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88274 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..