अल्पवयीन मुलीला बोहल्यावर चढवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीला बोहल्यावर चढवले
अल्पवयीन मुलीला बोहल्यावर चढवले

अल्पवयीन मुलीला बोहल्यावर चढवले

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे खोटे आधार कार्ड बनवून तिला तिच्या आई व मामाने गुजरातमध्ये बोहल्यावर चढवल्याचा प्रकार उल्हासनगरातून उघडकीस आला आहे. या पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावर तिची आई व मामाविरोधात हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही मुलगी तिच्या आई व मामासोबत नेवाळी नाका येथील एका चाळीत राहते. पूजा नावाच्या महिलेने मुलीचे खोटे आधार कार्ड बनवले. त्याआधारे मुलीची आई व मामा यांनी मुलीला गुजरातमध्ये नेले आणि २५ जूनला तिचा जयेश नाथानी या २५ वर्षीय तरुणासोबत विवाह लावून दिला. ही मुलगी गुरुवारी (ता. ७) उल्हासनगरात आल्यावर तिने हिललाईन पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक रणजित डेरे, महिला सहायक निरीक्षक अंबिका घस्ते करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88276 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top