ठाण्यात अकरा लाखांच्या गांजासह एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात अकरा लाखांच्या गांजासह एकाला अटक
ठाण्यात अकरा लाखांच्या गांजासह एकाला अटक

ठाण्यात अकरा लाखांच्या गांजासह एकाला अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : टेम्पोमधून गांजा घेऊन निघालेला चालक अंबलाल जगदीश जाट याला ठाणे शहर पोलिस दलाच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ११ लाखांचा ११० किलो गांजा जप्त केला असून टेम्पोसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कापूरबावडी नाका येथून ठाण्यात गांजा हा अमली पदार्थ घेऊन एक टेम्पो येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने गुरुवारी रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी येथे अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ सापळा लावला. या वेळी संशयित टेम्पोला घेराव घालून पोलिसांनी त्यास अडवले. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात ११ गोण्यात गांजा लपवल्याचे दिसून आले. या प्रकरणी टेम्पो चालकविरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास वागळे युनिट करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88282 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..