महिलेकडून उकळली ११ लाखांची खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेकडून उकळली ११ लाखांची खंडणी
महिलेकडून उकळली ११ लाखांची खंडणी

महिलेकडून उकळली ११ लाखांची खंडणी

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : एका महिलेचे तिच्या प्रियकरासोबतचे खासगी फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन सोनुराव नावाच्या खंडणीखोराने तिच्याकडून तब्बल ११ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या खंडणीखोराने या महिलेच्या दोन्ही मुलींवर वाईट नजर ठेवून त्यांना घेऊन येण्यास सांगत धमकावण्यास सुरुवात केल्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील ३४ वर्षीय तक्रारदार महिला वाशीत आपल्या तीन मुलींसोबत राहते. काही वर्षापूर्वी ती ट्रॉम्बे चिता कॅम्प येथे राहत असताना तिची मिराजराव याच्याशी मेसेंजरवरून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्या वेळी ही महिला मिराजराव याच्यासोबत दोन ते तीन वेळा केरळ येथे गेली असताना मिराजराव याने या महिलेसोबत खासगी व अश्लिल फोटो काढले होते. त्या वेळी मिराजराव याने त्याचा मित्र सोनुराव याच्याशी तिची ओळख करून दिली होती. कालांतराने या महिलेची सोनुराव याच्यासोबतदेखील चांगले संबंध निर्माण झाल्याने ती त्याच्यासोबत फोनवरून संपर्कात होती.
मात्र, पाच-सहा महिन्यांपूर्वी सोनुराव याने या महिलेला संपर्क साधून त्याच्याकडे मिराजराव याच्यासोबतचे खासगी व अश्लिल फोटो असल्याचे सांगत तिच्याकडे ११ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली; अन्यथा त्याच्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या या महिलेने राजस्थानमधील रेवाडिया येथे जाऊन सोनुराव याला ११ लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतरदेखील आरोपी सोनुराव याने या महिलेला संपर्क साधून तिच्या दोन्ही मुलींना त्याच्याकडे घेऊन येण्यास बजावले, अन्यथा तिचे व मिराजराव या दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांकडे गेल्यास तिला महागात पडेल, असेदेखील सोनुराव याने सदर महिलेला बजावले. त्यानंतर सोनुराव हा या महिलेला वारंवार धमकावत असल्याने अखेर या महिलेने एपीएमसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88285 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..