मुंबई : तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Megablock mumbai
तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक

मुंबई : तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रेल्वेरुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १०) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर रविवारी मध्यरात्री वसई रोड ते विरार अप-डाऊन धीम्या मार्गावर रविवारी चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागू शकतो.

मध्य रेल्वे-
कुठे- माटुंगा ते मुलुंड, अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी- सकाळी ११.५५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम - ब्लॉकदरम्यान सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबून मुलुंडहून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या सेवा नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यातून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड, माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे-
कुठे- पनवेल ते वाशी, अप-डाऊन मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम - पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद.

पश्चिम रेल्वे-
कुठे - वसई रोड ते विरार, अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी- रविवारी रात्री १२. ३० ते मध्य रात्री ४.४० वाजेपर्यंत
परिणाम- अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा आणि काही मेल- एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान अप- डाउन मार्गावर वळवण्यात येईल. रविवारी दिवसा ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88294 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..