यंदा गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या १६६ विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या १६६ विशेष गाड्या
यंदा गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या १६६ विशेष गाड्या

यंदा गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या १६६ विशेष गाड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गणपती उत्सवासाठी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठोकूरदरम्यान अतिरिक्त ६० गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने १०६ विशेष गणपती गाड्या चालविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकूण १६६ गाड्या धावणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११५३ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर (३० सेवा) पर्यंत दररोज रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि ठोकूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ४.३० वाजता पोहोचेल; तर ट्रेन क्रमांक ०११५४ विशेष १४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर (३० सेवा) दरम्यान ठोकूर येथून दररोज संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या दोन्ही गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबा असणार आहे. तसेच या गणपती विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण उद्यापासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
बॉक्स-
अशा आहेत विशेष गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनस- ठोकूर दैनिक विशेष (६० फेऱ्या)
मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (१६ फेऱ्या)
नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)
पुणे - कुडाळ विशेष (२ फेऱ्या)
पुणे-थिविम/कुडाळ-पुणे विशेष (४ फेऱ्या)
पनवेल - कुडाळ/थिवि - पनवेल विशेष (४ फेऱ्या)
मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (४४ फेऱ्या)
नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ फेऱ्या)
पुणे - कुडाळ विशेष (६ फेऱ्या)
पुणे - थिविम/कुडाळ - पुणे विशेष (६ फेऱ्या)
पनवेल - कुडाळ/थिविम - पनवेल विशेष (६ फेऱ्या)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88300 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..