शिंदे सरकारकडून ५ हजार कोटींची कामे रद्द करत महाविकासला दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे सरकारकडून ५ हजार कोटींची कामे रद्द करत महाविकासला दणका
शिंदे सरकारकडून ५ हजार कोटींची कामे रद्द करत महाविकासला दणका

शिंदे सरकारकडून ५ हजार कोटींची कामे रद्द करत महाविकासला दणका

sakal_logo
By

शिंदे सरकारकडून ५ हजार कोटींची कामे रद्द करत मविआला दणका


सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : राज्यातील सत्तांतरानंतर नवीन पालकमंत्री येईपर्यंत निधी थांबवण्याच्या सूचना जिल्हास्तरावर धाडण्यात आल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शुक्रवारी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील निविदा प्रक्रियेच्या सर्व स्तरावरील सर्व कामांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय जारी केला. सद्यस्थितीत ५ हजार २० कोटी ७४ लाख रुपयांची ४ हजार ३७ कामे रद्द करत सरकारने महाविकास आघाडीला दणका दिला आहे.
जलसंधारण महामंडळाकडील रद्द झालेल्या कामांमध्ये नाशिक विभागातील ६६२ कामांचा समावेश असून ही कामे ६४६ कोटी १७ लाख रुपयांची आहेत. जिल्हानिहाय कामांच्या निविदांची संख्या आणि कामांची रक्कम रुपयांमध्ये नाशिक- १७१-२७७ कोटी ८ लाख, धुळे- ६६- ४४ कोटी ४४ लाख, नंदूरबार- २८- २७ कोटी ६२ लाख, जळगाव- २६२- १५६ कोटी ६० लाख, नगर- १३५- १४० कोटी ४८ लाख याप्रमाणे आहे.
महामंडळाकडील सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचे मार्च २०२२ अखेरपर्यंत ३ हजार ४९० कोटी ९१ लाख रुपयांचे देणे बाकी आहे. त्यानंतर १ एप्रिल ते ३१ मे २०२२ या कालावधीत ६ हजार १९१ कोटी रुपये खर्चाच्या ४ हजार ३२३ नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यातील ५ हजार कोटींहून अधिक खर्चाची ४ हजारांहून अधिक कामे निविदास्तरावर आहेत. सरकारने घेतलेला निर्णय पाहता, देणेबाकी वाढू नये, हे कारण एकीकडे दिल्याचे दिसत आहे. दुसरीकडे मात्र जलसंधारणाच्या कामांचा महाविकास आघाडी सरकारने वाढवलेल्या वेगाला सरकारच्या निर्णयामुळे चाप लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
...
इन्फोबॉक्स
१४-१
रद्द करण्यात आलेली कामे
० ‘गेटेड'' सिमेंट बंधारे
० सिमेंट बंधारे
० साठवण तलाव
० लघुपाटबंधारे योजना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88318 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..