कंपनीत घुसलेल्या अजगराची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीत घुसलेल्या अजगराची सुटका
कंपनीत घुसलेल्या अजगराची सुटका

कंपनीत घुसलेल्या अजगराची सुटका

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : रबाळे एमआयडीसीतील एका कंपनीच्या कार्यालयात घुसलेल्या पाच फूट लांबीच्या अजगराला अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी बाहेर काढले. त्यानंतर स्वयंसेवकाने त्याला जंगलात सोडले.

रबाळे एमआयडीसीतील ज्योती प्रोसेस इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. ८) सकाळी एक साप घुसला होता. याबाबतची माहिती ज्योती शिंदे यांच्याकडून मिळाल्यानंतर अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे स्वयंसेवक भूषण साळवे यांनी सदर कंपनीत धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पाच फूट लांब असलेल्या बिनविषारी अजगराला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी या सापाची माहिती ठाणे येथील वन विभागाला दिल्यानंतर सापाची पशुवैद्यक डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर सापाला जंगलात सोडून देण्यात आल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक आणि एसीएफ आणि पीएडब्ल्यूएस मुंबईचे संस्थापक सुनीश सुब्रमण्यन यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88326 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..