
वीज चोरी करताना दुसऱ्यांदा पकडले
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : वीज चोरीप्रकरणात २०१६ मध्ये पकडलेल्या व्यक्तीला पुन्हा चोरी करताना महावितरणच्या पथकाने पकडले. प्रकाश बामा पाटील या व्यक्तीने घरगुती वीज मीटरमध्ये फेरफार करून एक लाख २० हजार रुपये किमतीची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
१३ जून रोजी महावितरणचे वीज चोरी शोध पथक खारघर येथील कोपरा गावात तपासणी करत होते. या पथकाने प्रकाश बामा पाटील यांच्या घरातील वीज मीटरची तपासणी केली असता त्याने अनधिकृतरीत्या लूप करून थेट केबल टाकल्याचे आढळून आले. प्रकाश पाटील याने मागील वर्षभरात सुमारे एक लाख २० हजार रुपयांची १०,४२८ युनिट्स वीज चोरी केल्याचे समोर आले. महावितरण पथकाच्या तपासणीत प्रकाश पाटील याला २०१६ मध्येही वीज चोरी प्रकरणात पकडले असल्याचे उघडकीस आले. त्या वेळी २७,३७० रुपयांची तडजोड रक्कम भरून सदरचे प्रकरण मिटवण्यात आले होते; मात्र त्याला पुन्हा वीज चोरी करताना पकडण्यात आल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88334 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..