सावरोली शाळेत आषाढीनिमित्त ज्ञानदिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरोली शाळेत आषाढीनिमित्त ज्ञानदिंडी
सावरोली शाळेत आषाढीनिमित्त ज्ञानदिंडी

सावरोली शाळेत आषाढीनिमित्त ज्ञानदिंडी

sakal_logo
By

खर्डी, ता. ९ : शहापूर तालुक्यातील सावरोली (बु.) जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात ज्ञानदिंडी काढून येथील नागरिकांना वारकऱ्यांच्या दिंडीचे दर्शन घडवले. याबद्दल तालुक्यातील मान्यवरांनी येथील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शाळेतील ७२ विद्यार्थ्यांना पंढरपूरच्या आदर्शवारीची अनुभूती मिळावी, या उद्देशाने सावरोली जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत ज्ञानदिंडीचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पालखीत पुस्तके, वृक्ष व डोक्यावर घागर घेऊन गावातील रस्त्यावर दिंडी काढून ज्ञानार्जनाचा संदेश दिला. वृक्षलागवड व स्वच्छतेसंदर्भात घोषणा दिल्या. लेझीमच्या माध्यमातून या ज्ञानदिंडीचे संचलन केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारीची वेशभूषा करून हरिपाठावर ताल धरला होता. हे व्यवस्थापन बघून गावकऱ्यांना पंढरपूरच्या वारीची अनुभूती आली असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
या दिंडीत सरपंच रोहन चौधरी, सदस्या रूपाली लुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बेबी सोंगाळ, अपर्णा मोरे, मुख्याध्यापक मनोज गोंधळी, शिक्षक अरुणा शेलार, विजय उदार व पूनम उबाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88344 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top