
कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे ११ जुलैपासून शैक्षणिक दाखले शिबिरे
भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेश व इतर शैक्षणिक कामांसाठी भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय विविध ठिकाणी ११ ते २२ जुलैपर्यंत विविध ठिकाणी शैक्षणिक दाखले शिबीर भरवले जात आहे.
या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल दाखला, स्थानिक वास्तव्य दाखला दिला जाणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलतींसाठी ज्येष्ठ नागरिक दाखला दिला जाईल. त्यासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स घेऊन यावेत, असे आवाहन कपिल पाटील फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे. लोनाड गटातील बापगाव नाका येथे सोमवारी ११ जुलै रोजी, खारबाव गटातील खारबाव ग्रामपंचायत कार्यालयात १२ जुलै रोजी, अंबाडी गटात अंबाडी नाका येथील ज्ञानेश्वर मंदिरात १३ जुलै रोजी, पडघा गटामध्ये पडघा येथील महाजनवाडी हॉलमध्ये १४ जुलै रोजी, राहनाळ गटात जिल्हा परिषदेच्या राहनाळ येथील शाळेत १५ जुलै रोजी आणि अंजुर गटात जिल्हा परिषदेच्या दिवे-अंजुर येथील शाळेत २२ जुलै रोजी शिबिर भरविण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88346 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..