सावित्रीबाई विद्यालयात एकतेची दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई विद्यालयात एकतेची दिंडी
सावित्रीबाई विद्यालयात एकतेची दिंडी

सावित्रीबाई विद्यालयात एकतेची दिंडी

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुले-मुली, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळा आणि ट्युलीप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त शाळेत दिंडी आयोजित केली. यंदा आषाढी आणि ईद एकाच दिवशी असल्याने या वारीला वेगळे महत्त्व आहे. त्यानिमित्त ही एकतोची दिंडी काढण्यात आली.
साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळेच्या संचालिका ज्योती राजेश सुभेदार आणि ट्युलीप इंग्लिश शाळेच्या सलोनी सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीला हिंदू-मुस्लिम मुलामुलींनी सहभाग घेत एकतेचे दर्शन घडवले. मुस्लिम वेशभूषा केलेल्या मुलांनी दिंडी खांद्यावर घेत हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88347 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..