कुपोषण मुक्तीसाठी आता ‘बाळ कोपरा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुपोषण मुक्तीसाठी आता ‘बाळ कोपरा’
कुपोषण मुक्तीसाठी आता ‘बाळ कोपरा’

कुपोषण मुक्तीसाठी आता ‘बाळ कोपरा’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ग्रामीण भागातील कुपोषणाला आळा घालण्यासाठी सरकारच्या विविध योजनांसह ठाणे जिल्हा परिषद नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्‍या संकल्पनेनुसार या आर्थिक वर्षात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी ‘बाळ कोपरा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत एक कोपरा तयार करून या कोपऱ्यात क्षार, जीवनसत्वे व सुक्ष्म पोषक तत्त्वे असणारे खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहे. हे खाद्यपदार्थ बालक स्वतःच्या हाताने खाऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पोषण मंडळाच्या अहवालानुसार वयोगटाप्रमाणे क्षार, जीवनसत्वे व सूक्ष्म पोषक तत्त्वे आहारातून मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना नियमित आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून दिल्यास त्यांना योग्य ती प्रथिने व उष्मांक मिळून त्यांचे कुपोषण दूर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामध्ये अंगणवाडीमध्ये बालकांना नाचणीयुक्त बिस्कीट, राजगिरा स्लाईस, बिस्कीट, खोबरा मिक्स वडी आदी अतिरिक्त आहार देण्याचे प्रस्तावित आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्‍या महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारीत ग्रामीण व आदिवासी भागामधील नऊ प्रकल्पांतर्गत एकूण १,८९४ केंद्रांमध्ये सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील १,३१,३०७ मुले योजनेचा लाभ घेतात. विभागांतर्गत सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके व गर्भवती, स्तनदा माता यांना घरी नेऊन खाण्यायोग्य आहार देण्यात येतो. तसेच तीन ते सहा वर्षे वयोगटातील अंगणवाडीतील बालकांना अंगणवाडीमध्ये गरम, ताजा आहार देण्यात येतो, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) संजय बागूल यांनी दिली.

कोट :
बाळ कोपरा संकल्पनेमुळे ठाणे जिल्ह्यातील कुपोषण कमी होणार आहे. बालकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे बालकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणार असून शरीरातील सर्व धातूंना पुष्टी देणारे, हाडे व मांसपेशी यांना बळकटी देणारे, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवणारे, वजन वाढवणारे, रक्त शुद्ध व वृद्धी करणारे, पचन करणारे पौष्टिक प्रोटीनयुक्त असलेले पोषक आहार मिळाल्याने बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
- डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88351 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top