पदपथावर सिमेंट ठोकळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथावर सिमेंट ठोकळे
पदपथावर सिमेंट ठोकळे

पदपथावर सिमेंट ठोकळे

sakal_logo
By

कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील काडसिद्धेश्वर मार्गावरील पदपथावर दुभाजकाचे ठोकळे ठेवण्यात आले आहेत. तब्बल सहा महिन्यांपासून पालिकेने ठेवलेले ठोकळे तसेच पडून असल्याने पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करत मार्गक्रमण करावे लागत आहे. पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांसह पादचार्‌यांमध्‍ये संताप व्यक्त होत आहे.
कांदिवली बोरिवली सीमा रेषा जोडणाऱ्या काडसिद्धेश्वर मार्गाच्या गणेश वैभव गृहनिर्माण संस्थेसमोरील पदपथावर गेल्या सहा महिन्यांपासून ठेवण्यात आलेल्या ठोकळ्यांचा नाहक त्रास नागरिक सहन करीत आहेत. दुभाजाकच्या नूतनीकरणात काढण्यात आलेले ठोकळे बाजूलाच पदपथावर टाकण्यात आले. मार्गावर सातत्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्‍यातच शाळा सुरू झाल्या असल्‍याने मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालक वर्गाला येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करीत, जीव मुठीत घेऊनच चालावे लागत आहे. त्‍यामुळे पालिकेने तातडीने ठोकळे काढून स्थानिकांसह पादचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पालिका अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचा विचार करून बेशिस्त कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी. ठोकळे तातडीने काढावेत.
- प्रकाश डोके, स्थानिक रहिवासी

अभियंत्यांसह पदपथाची पाहणी करून ठेवण्यात आलेले सिमेंट ठोकळे काढण्यात येतील.
- विशाल पाटील, सहायक अभियंता

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88366 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top