पिस्तूल विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिस्तूल विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत
पिस्तूल विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत

पिस्तूल विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : खारघरमधील गुरुद्वारा ते पापडीचा पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन आलेल्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. जावेद खान (२६) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. तळोजा जेलच्या कमानीजवळ एक तरुण विनापरवाना पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याने हे पिस्तूल कुठून व कुणाला विक्रीसाठी आणले, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88367 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..