भिवंडीत ७४ लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत ७४ लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त
भिवंडीत ७४ लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त

भिवंडीत ७४ लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त

sakal_logo
By

भिवंडी, ता. ९ ( बातमीदार) : भिवंडी गुन्हे शाखा व जिल्हा कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण कक्ष यांनी आज सकाळी भिवंडीत केलेल्या छापा कारवाईत पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया या कंपनीचा मुदतबाह्य विक्रीस मनाई असलेल्या कीटकनाशकांचा ७४ लाख रुयांचा साठा जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना नारपोली न्यू टावरे कंपाऊंड येथील एका गोदामात मुदतबाह्य कीटकनाशक औषधाचा साठा विक्रीस साठी ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ठाणे जिल्हा कृषी कार्यालयाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विजय तुपसौदर्य यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या विशेष पथकासह पोलिसांनी दोन गोदामात छापा टाकला. तेव्हा तेथे पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया बंगलोर या कंपनीचे जुलै सप्टेंबर नोव्हेंबर २०२० रोजी मुदत संपलेल्या कीटकनाशकांचा २६,८८० किलो वजनाचा ७४ लाख १९ हजार रुपये किमतीचा साठा आढळला. या प्रकरणी शरद रोहिदास नलावडे (रा. कल्याण पूर्व ) याचा विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88379 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..