तबला, ढोलकीच्या तालात, विठू रायाला साद... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तबला, ढोलकीच्या तालात, 
विठू रायाला साद...
तबला, ढोलकीच्या तालात, विठू रायाला साद...

तबला, ढोलकीच्या तालात, विठू रायाला साद...

sakal_logo
By

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा

दोन वर्षे कोरोनामुळे चर्मवाद्याचा व्यवसाय ठप्प होता. परंतु यंदा निर्बंध नसल्याने पंढरीची वारी, साई व एकवीरा मातेची पालख्या मोठ्या प्रमाणात निघाल्‍या आहेत. त्यामुळे पुणेकर तबलेवाल्यांना पनवेलमध्ये सुगीचे दिवस आले आहेत. तबला, पखवाज, ढोलकीची खरेदी व दुरुस्‍तीचे सूर बऱ्यापैकी जुळू लागले आहेत. दुकानात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
माहिती व तंत्रज्ञानाचा युगात आजही आध्यात्मिक व धार्मिक परंपरा जोपासली जात आहे. पनवेल परिसरात भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठाचे आध्यात्मिक अधिष्ठान गावागावांत दिसून येते. वारकरी संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग याठिकाणी वास्‍तव्यास असून माळकरी टाळकरी, वारकरी ही भागवत धर्माची ओळख मानली जाते. खांद्यावर भगवा पताका घेत अनेक भाविक पंढरीच्या वारीत जातात. रायगड व ठाणे जिल्ह्यातून अनेक दिंड्या यंदा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ यंदा झाल्या आहेत. त्‍यामुळे भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळांनी आपले भजनाचे साहित्य नव्याने खरेदी केले. तर काहींना जुनी वाद्ये दुरुस्‍त केली आहेत.
पनवेल शहरातील टपाल नाक्यावर भगवान नाना पुणेकर तबलेवाले हे दुकान अनेक वर्षांपासून आहे. पुणे येथील बुधवारपेठेतील मूळचे असलेले पुणेकर कुटुंबीय पनवेलमध्ये व्यवसायानिमित्त आले. चर्मवाद्याची निर्मिती करणारा कारखाना ते चालवतात. त्याचबरोबर जुन्या वाद्याच्या दुरुस्तीही करतात. त्यामध्ये पखवाज, तबला, ढोलकी, ढोल या वाद्यांचा समावेश आहे. हे सामुहिक वाद्य असल्याने कोरोना काळात संसर्ग होवू नये म्हणून भजन, हरीनाम सप्ताह, वारी, पालखी सोहळ्याला बंदी होती. त्यामुळे व्यवसायावर अवकळा आली होती. हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला होता. आता निर्बंध हटल्याने मोठ्या प्रमाणात भाविक वारीत गेले. दिंड्या, पालख्या पंढरीच्या दिशेने पंधरा दिवसांपूर्वीच मार्गस्थ झाल्या. त्यामुळे पुणेकर यांच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात चर्मवाद्यांची खरेदी झाल्‍याचे ज्ञानेश्वर पुणेकर यांनी सांगितले.

पंढरीच्या विठ्ठलाने गाऱ्हाणे ऐकले
यंदा पंढरीच्या वारी मोठ्या प्रमाणात निघाल्या भजन, कीर्तन सुरू झाले. हरिनामाचा जप भाविक सामुहिकरीत्या करू लागले आहेत. आमचा व्यवसायही पूर्वपदावर आल्‍याचे प्रवीण पुणेकर यांनी सांगितले. गुरूपौर्णिमा ते दसरा या कालावधीत सर्वात जास्त व्यवसाय असतो. यावेळी चोवीस तास काम केले तरी वेळ कमी पडतो. गणेशोत्सवात यंदा नवीन वाद्यविक्री आणि दुरुस्‍तीची कामे वाढतील, असा विश्‍वास पुणेकरांना आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88387 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..