आषाढी एकादशी निमित्ताने भिवंडीत भरपावसात विद्यार्थ्यांची बाल वारकरी दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी एकादशी निमित्ताने भिवंडीत भरपावसात विद्यार्थ्यांची बाल वारकरी दिंडी
आषाढी एकादशी निमित्ताने भिवंडीत भरपावसात विद्यार्थ्यांची बाल वारकरी दिंडी

आषाढी एकादशी निमित्ताने भिवंडीत भरपावसात विद्यार्थ्यांची बाल वारकरी दिंडी

sakal_logo
By

भिवंडी, ता. १० (बातमीदार ) : आषाढी एकादशीच्‍या निमित्ताने प. रा. विद्यालय प्राथमिक शाळा व वैश्य समाज महिला मंडळ अध्यक्षा रोमा आळशी यांच्या पुढाकाराने बाल वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात निघालेल्या या दिंडीमध्ये शिक्षकासह विद्यार्थी व महिला, पालकवर्ग नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ व ‘प्रदूषणमुक्त भिवंडी’ याबाबत जनजागृती विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली.
शहरातील ब्राह्मण आळी येथील प.रा.विद्यालय येथून वाजत गाजत निघालेल्या बाल वारकरी दिंडी सोहळ्यात इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी व पालक वर्ग पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. पदयात्रा करीत निघालेल्या या दिंडी सोहळ्याचा समारोप वाणी आळी येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पाटील, शिक्षक रश्मी बोरसे, छाया चौधरी, वैश्य समाज महिला मंडळ अध्यक्षा रोमा आळशी, पंढरीनाथ देवस्थान वाणी आळीचे सरपंच दिनेश शेटे, पंच निलेश आळशी, एस.पिंपळे, सौ.जठार आदी मान्यवर या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. सरपंच दिनेश शेटे, पंच निलेश आळशी यांनी वाणी आळी प्रवेशद्वारावर दिंडी पालखीची पूजा करून विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाप्रसादाचे वाटप केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88412 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..