अल्याणी शाळेचे विद्यार्थी झाले वारकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्याणी शाळेचे विद्यार्थी झाले  वारकरी
अल्याणी शाळेचे विद्यार्थी झाले वारकरी

अल्याणी शाळेचे विद्यार्थी झाले वारकरी

sakal_logo
By

किन्हवली, ता. ९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील अल्याणी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वारकरी दिंडी काढून गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले होते.
वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती; तर अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून हरिनामाचा गजर करत दिंडी काढली. गावातील प्रत्येक गल्लीबोळात या वारकरी दिंडीचे स्वागत करण्यात आले. शाळेपासून निघालेली ही बाल वारकरी दिंडी गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात विसावली. अनेक विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, फुगड्या रिंगण घालत दिंडीला शोभा आणली. बाल वारकरी दिंडीच्या आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक भगवान चिमटे, सहशिक्षक बाळकृष्ण भोईर, शेखर घोडविंदे, संतोष सोनवणे, अश्विनी सोनवणे, दर्शना शिर्के, स्मिता पाटील, विजया पाटील, संध्या गोसावी व शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी उत्तम सहभाग नोंदवला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88413 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..