
पीएनबीची रक्षक प्लस योजना
मुंबई, ता. ९: पंजाब नॅशनल बँकेने भारतीय वायुसेनाशी पीएनबी रक्षक प्लस या योजनेसाठी नुकताच सामंजस्य करार केला आहे. या करारावर पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अतुल कुमार गोयल आणि भारतीय हवाई दलांच्या वतीने एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी उपस्थित होते.
ीपीएनबीसोबतच्या या कराराविषयी बोलताना अतुल कुमार गोयल म्हणाले की, पीएनबी कुटुंबाला देशसेवा करण्याची संधी देणारा हा ऐतिहासिक क्षण आहे. सध्या पीएनबी देशभरात पसरलेल्या १२० कॅन्टोन्मेंट शाखांद्वारे सशस्त्र दलांना मदत करत आहे. यापैकी नऊ शहीद जवानांच्या सन्मानार्थ विशेष शाखांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. याशिवाय, आम्ही आमच्या योद्धांसाठी आणखी एटीएम, डिजिटल आणि डोअरस्टेप बँकिंग सेवा सुरू करू इच्छित आहोत. या योजनेमध्ये संरक्षण कर्मचारी, सेवानिवृत्त आणि प्रशिक्षणार्थी तसेच सशस्त्र दल, केंद्रीय पोलिस सशस्त्र दल, राज्य पोलिस दल, मेट्रो पोलिस यांमधील सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांसाठी वैयक्तिक अपघात विमा आणि हवाई अपघात विमा यांचा समावेश करण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88425 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..