अंबरनाथ येथे एकाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ येथे एकाचा बुडून मृत्यू
अंबरनाथ येथे एकाचा बुडून मृत्यू

अंबरनाथ येथे एकाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

अंबरनाथ/ भिवंडी, ता. ९ (बातमीदार) ः पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरलेल्या अंबरनाथ येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला; तर भिवंडी तालुक्यातील बंधाऱ्यात दोघे पाण्यात वाहून गेले. दोघेही सध्या बेपत्ता असून अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
अंबरनाथ येथील विवेक भोईर (वय ३०) हा मित्रांसह शुक्रवारी चिखलोली धरणावर गेला होता. विवेक अंघोळीसाठी पाण्यात उतरला; मात्र खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्याचा थांग लागला नाही. अखेर आज (ता. ९) दुपारी विवेकचा मृतदेह हाती लागल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.
भिवंडी तालुक्यात झालेल्या दोन घटनांमध्ये पोहण्यासाठी पाण्यात उतरलेले दोन युवक वाहून गेले. अग्निशमन दलाकडून दोघांचाही शोध घेतला जात होता; मात्र रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नाही. पहिल्या घटनेत भिवंडीतील ग्रामीणच्या महाप येथील पिंट्या पंढरीनाथ जाधव (वय ३५) हा युवक शुक्रवारी पाच्छापूर रस्त्यावरील बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. कालपासून आज रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. दुसऱ्या घटनेत भिवंडी येथील कामवारी नदीत शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या आसिफ आलम अन्सारी (वय १९) पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. अग्निशमन दलाकडून त्याचा शोध घेण्यात आला; मात्र अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88431 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top