या बाळांचे माता पिता कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या बाळांचे माता पिता कोण?
या बाळांचे माता पिता कोण?

या बाळांचे माता पिता कोण?

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १० (बातमीदार) ः अंधेरी पश्चिम येथील सेंट कॅथरिन्स होममधील आश्रित नऊ मुलांच्या माता-पित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या व्यवस्थापन करत आहे. या नऊ मुलांमध्ये तारा, विजेता, गायत्री, अश्विनी, मेहेक, नालंदा व एन के मालवणी या सात मुली आहेत; तर आदर्श व उमेद हे दोघे मुलगे आहेत. ही सर्व मुले मुंबई उपनगरातील विविध पोलिस ठाण्यांनी ताब्यात घेतली होती व त्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीने दिलेल्या आदेशाने सेंट कॅथरिन्स होममध्ये दाखल करण्यात आले होते. या मुलांच्या कुटुंबियांनी किंवा त्यांच्याविषयी माहिती असलेल्यांनी सेंट कॅथेरिन्स होम, वीरा देसाई मार्ग, अंधेरी, पश्चिम या पत्त्यावर किंवा ९१३७२७९३२४ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88447 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..