कोविड पार्श्वभूमीवर होणार व्हायरल फ्लूमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड पार्श्वभूमीवर होणार व्हायरल फ्लूमध्ये वाढ
कोविड पार्श्वभूमीवर होणार व्हायरल फ्लूमध्ये वाढ

कोविड पार्श्वभूमीवर होणार व्हायरल फ्लूमध्ये वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कोविडच्या पार्श्वभूमीवर व्हायरल फ्ल्यूमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यातच ओमिक्रॉनच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचेही आव्हान असल्याने कोविड रुग्णवाढीची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्क्यांनी घट नोंदली गेली आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले, की गेल्या महिन्यात अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली तेव्हा रुग्णवाढीवर लक्ष केंद्रित केले गेले. त्यामुळे त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन केले जावे. चाचणी, उपचार व ट्रेसिंग आणि मिशन सेव्ह लाईव्हज यामुळे मुंबईतील रुग्ण आणि मृत्यू नियंत्रणात आणण्यात मदत झाली; मात्र तज्ज्ञांनी येत्या दोन आठवड्यांत रुग्णांमध्ये वाढ होण्याचा इशारा दिला आहे. कारण पावसाळी फ्ल्यूची प्रकरणे मोठ्या प्रमाणात नोंद होतील, ज्याची कोरोनासारखीच लक्षणे आहेत.
पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, की मुंबईतील सक्रिय रुग्णांत घट होण्यामागे लसीकरण हे एक महत्त्वाचे कारण आहे. सक्रिय रुग्णांचा भार कमी झाला असून कोविड मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. शिवाय बहुतेक रुग्णांत लक्षणे नव्हती किंवा सौम्य लक्षणे होती, ज्यातून ते तीन ते चार दिवसांत बरे होत आहेत असेही ते म्हणाले.
....
लसीकरणाकडे दुर्लक्ष नको!
कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि पुढील सहा ते सात महिने मास्क घालावे लागतील. कारण विषाणू समुदायात पसरत आहे आणि डेल्टा, डेल्टा डेरिव्हेटिव्हज आणि ओमिक्रॉन प्रकारांचा संसर्ग होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांनी लशीचा एकच डोस घेतला आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण केले पाहिजे, असे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
....
पालिकेचा उपाययोजनांवर भर
पालिका लसीकरणासाठी विविध पावले उचलत आहे, ज्यांचा दुसरा डोस चुकला असेल, अशा नागरिकांशी संपर्क साधणे, जास्त लोकसंख्या असलेल्या भागात लसीकरण शिबिरे आयोजित करणे आणि हाऊसिंग सोसायट्यांना कोणाचा डोस चुकल्यास त्याची माहिती देण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा अनेक उपाययोजना महापालिका राबवत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88451 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..