वास्तु विहार, सेलिब्रेशन गृहसंकुलात दूषित पाणी पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वास्तु विहार, सेलिब्रेशन गृहसंकुलात दूषित पाणी पुरवठा
वास्तु विहार, सेलिब्रेशन गृहसंकुलात दूषित पाणी पुरवठा

वास्तु विहार, सेलिब्रेशन गृहसंकुलात दूषित पाणी पुरवठा

sakal_logo
By

खारघर, ता. १० (बातमीदार) : खारघरमधील सिडकोच्या वास्‍तुविहार, सेलिब्रेशन गृहनिर्माण सोसायटीत गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे पोटदुखी, उलटी आणि जुलाबाच्या आजाराने रहिवासी त्रस्‍त आहेत. याप्रकरणी सिडकोने योग्य उपाययोजना करावी, असे पत्र स्थानिक माजी नगरसेविका संजना समीर कदम यांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाला दिले आहे.
खारघर सेक्टर १६ आणि १७ मधील वास्‍तुविहार आणि सेलिब्रेशन सोसायटीत जवळपास एक हजार कुटुंब वास्तव्य करीत आहे. गेले काही दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र दहा दिवसांपासून होत असलेला पाणी पुरवठा दूषित असल्यामुळे नागरिकांना पोटदुखी, उलटी-जुलाब या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे सिडकोने वास्‍तुविहार आणि सेलिब्रेशन सोसायटीला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पाहणी करावी तसेच पाणी नमुना तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी केली आहे. या विषयी सिडकोच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, तक्रार प्राप्त होताच पाणी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

वास्तुविहार, सेलिब्रेशनमध्ये उलटी, जुलाबच्या तक्रारी नागरिकाकडून प्राप्त होताच सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी राहुल सरवदे यांनी भेट संबंधित संकुलांत भेट देत पाणी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहे.
- संजना कदम, माजी नगरसेविका, पनवेल

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88453 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top