
झाडांच्या फांद्या उचलण्याची मागणी
कामोठे, ता. ११ (बातमीदार) : मान्सूनपूर्व कामाच्या अंतर्गत पनवेल महापालिकेने कामोठे शहरात अनेक ठिकाणी वृक्षछाटणी केली आहे; मात्र झाडाच्या फांद्या, पालापाचोळा अद्यापपर्यंत उचलला गेला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांनी कचरा उचलण्याची मागणी केली आहे.
पनवेल महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई, वृक्ष छाटणीची कामे व्यवस्थित केली असल्याचा दावा केला; मात्र पहिल्याच पावसात कामोठे, नौपाडा व जुई परिसरात सखल भागात पाणी साचले होते. गटाराचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शहरातील अनेक ठिकाणी वृक्षछाटणी केल्यावर फांद्या व पालापाचोळा उचलला गेला नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिका व सिडको यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. मान्सूनपूर्व नालेसफाई व वृक्षछाटणीची कामे नीट होत नाहीत, असा आरोप शेकापचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केला.
विभागातील नालेसफाई आणि वृक्षछाटणीची कामे व्यवस्थित झाली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून कचरा नियमित उचलला जातो.
- अरविंद पाटील, कामोठे प्रभाग अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88458 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..