दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

देहर्जे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटप
विक्रमगड (बातमीदार) ः देहर्जे परिसरातील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन आणि चॅरिटेबल या संस्थेच्य‍ा माध्यमातून २६० विद्यार्थ्यांन‍ा बॅग व शैक्षणिक साहित्यवाटप केले. य‍ा वेळी गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राहुल पाटील, विपुल पाटील, तुषार पाटील यांनी विशेष सहकार्य केले; तर कार्यक्रमाची प्रास्ताविक भगवान कुरकुटे; तर संस्थेचे आभार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम हरड यांनी व्यक्त केले.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे वृक्षसंवर्धन
विक्रमगड (बातमीदार) ः ज्‍येष्ठ निरुपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय विक्रमगड (वाकी-मलवाडा) येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विद्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्‍या शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार यांच्या उपस्थितीत झाले. या दरम्यान तहसीलदार चारुशीला पवार यांनी मनोगत व्यक्त करताना मुलींनी विविध स्पर्धा परीक्षेत कशा पद्धतीने यश संपादन करावे, याविषयी मार्गदर्शन केले.

प्राथमिक विद्यामंदिर शाळेची प्रभात फेरी
पालघर (बातमीदार) ः शाळाबाह्य, अनियमित व स्थंलातरित बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ‘मिशन झिरो ड्रॉप आउट’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत भगिनी समाज संस्था संचालित प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेने प्रभातफेरीचे आयोजन केले होते. प्रभातफेरीमध्ये आषाढी एकादशीचे निमित्त साधून ‘विठ्ठल रखुमाई व वारकरी’ यांच्या वेशभूषेत काही विद्यार्थी सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात निघालेल्या प्रभातफेरीतील दृश्य पाहून जणू काही विठूरायाच आपल्याला ‘आपली मुले, शाळेत पाठवा’ हा संदेश देत असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक व शाळेतील शिक्षकवृंद यांनी या प्रभातफेरीचे आयोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88485 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top