सोन्याची नाणी विकण्याच्या बहाण्याने गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याची नाणी विकण्याच्या बहाण्याने गंडा
सोन्याची नाणी विकण्याच्या बहाण्याने गंडा

सोन्याची नाणी विकण्याच्या बहाण्याने गंडा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर): ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी विकण्याच्या बहाण्याने एका टोळीने कस्टम विभागातील अधीक्षकाकडून तब्बल १३ लाख ५० हजार रुपये उकळले. त्याला ५०० बनावट नाणी देऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. न्हावा शेवा पोलिसांनी त्रिकुटाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेला व्यक्ती उलवे भागात राहण्यास असून तो भारतीय कस्टम विभागात अधीक्षकपदी कार्यरत आहे. ३ जुलै रोजी या अधीक्षकाला राजु प्रजापती नावाच्या व्यक्तीने त्याच्याजवळ ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी असल्याचे सांगितले. सदरची नाणी विकायचे असल्याचे सांगून एक सोन्याचे नाणे दाखवले. अधीक्षकाने हे नाणे उलवे भागातील त्याच्या ओळखीतील सोनाराकडून तपासून घेतले असता, ते सोन्याचे नाणे असल्याचे समजले. अधीक्षकाने उर्वरित सोन्याच्या नाण्यांबाबत चौकशी केली असता, त्याने बोलणी करण्यासाठी कळवा येथे येण्यास सांगितले.

कळवा येथे राजु प्रजापतीने एक महिला व पुरुष यांच्यासह अधिक्षकाची भेट घेतली. त्यानंतर ५०० सोन्याची नाणी दाखविल्यानंतर त्यातील १५-२० नाणी तपासण्यासाठी अधिक्षकाने मागून घेतली. मात्र त्यांनी एकच नाणे दिले. अधीक्षकाला ते नाणे खरे असल्याचे सोनाराने सांगितले. त्यानंतर अधीक्षकाने सर्व सोन्याची नाणी विकत घेण्याची तयारी दर्शविली. सदर टोळीने त्याला १५ लाख रुपये घेऊन भिवंडी येथील मानकोली नाका येथे येण्यास सांगितले.

अधीक्षकाने घरातील दागिने गहाण ठेवून, तसेच मित्र मंडळीकडून उसने पैसे घेऊन १३ लाख ५० हजार रुपये एकत्र केले. भिवंडी येथे गेला असता त्रिकुटाने नाणी देऊन त्याच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर उलवे येथे आल्यानंतर त्याने सोनाराकडून सदरचे दागिने तपासून घेतली असता सदरची नाणी बनावट असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88505 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top