कोव्हिडं रजेवर असलेला शिक्षा झालेला आरोपी फरार..भिवंडीत गुन्हा दाखल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोव्हिडं रजेवर असलेला शिक्षा झालेला आरोपी फरार..भिवंडीत गुन्हा दाखल.
कोव्हिडं रजेवर असलेला शिक्षा झालेला आरोपी फरार..भिवंडीत गुन्हा दाखल.

कोव्हिडं रजेवर असलेला शिक्षा झालेला आरोपी फरार..भिवंडीत गुन्हा दाखल.

sakal_logo
By

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : शिक्षा झाल्याने कारागृहात असलेल्या आरोपींना कोरोना काळात आपत्‍कालीन आकस्मित अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. यापैकी एक आरोपी रजा समाप्त झाल्यावरही कारागृहात शिक्षा भोगण्यास हजर न झाल्याने तो फरार झाल्याची तक्रार पुणे येथील कारागृह पोलिसांनी भिवंडीतील नारपोली पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बलाळ यांनी पथकासह शोध सुरू केला आहे.
मोहम्मद सददाम शफीक शेख उर्फ लस्सीवाला असे आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, भिवंडी शहर पोलिस स्टेशन येथील एका गुन्ह्यात ठाणे येथील अतिरिक्त सत्र न्यायालय यांनी आरोपी मोहम्मद सददाम शफीक शेख उर्फ लस्सीवाला यास २०१७ मध्ये सात वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड व तो न भरल्यास १४ दिवस कारावास, अशी एकत्रित शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा आरोपी येरवडा कारागृहात भोगत असताना कोरोना काळात त्‍याला आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88518 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top