
ठाण्यात होणार मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचेही आयोजन करण्यात येणार आहे.
ठाण्यातील आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयात शनिवारी झालेल्या विविध संस्थांच्या नियोजन बैठकीत या नागरी जनसत्कार कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. आधी शिवसेनेचे कार्यकर्ते, शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार ते मंत्री आणि आता थेट मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला ऐतिहासिक बहुमान मिळवून दिला आहे. याबद्दल ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील सेवाभावी संस्थांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी जनसत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ‘मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नागरी गौरव समिती’तर्फे केले जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88519 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..