उरणच्या कराटे विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणच्या कराटे विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड
उरणच्या कराटे विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

उरणच्या कराटे विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये गोशीन रियू कराटे संघटनेच्या उरण व पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात पदके पटकावली. अमिता अरुण घरत, अमिशा अरुण घरत, रोहित शरद घरत, शुभम म्हात्रे यांनी सुवर्णपदक जिंकले. अमर घरत, करण प्रदीप पाटील यांनी रौप्य; तर अंश राजेंद्र म्हात्रे याने कास्य पदक पटकाविले. सुवर्णपदक विजेत्यांची नगर जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली. या विद्यार्थ्यांना शिहान राजू कोळी, गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88553 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..