वाड्यात भात लावणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात भात लावणीला वेग
वाड्यात भात लावणीला वेग

वाड्यात भात लावणीला वेग

sakal_logo
By

वाडा, ता. ११ (बातमीदार) ः जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने वाडा तालुक्यात मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागत आहेत. त्यात मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज ३५० ते ४०० रुपये मजुरी, सकाळी न्याहारी, दुपारी जेवण द्यावे लागते. यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खर्चिक व्यवसाय होऊ लागला असल्याने ती परवडेनाशी झाली असल्‍याचे मत काही शेतकऱ्‍‌यांनी व्‍यक्‍त केले आहे.

२३ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली
तालुक्यात १७६ गावे, २०० हून अधिक पाडे असून २३ हजार हेक्टर क्षेत्र भातपीकाखाली आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. येथे झिनी (वाडा कोलम), सुरती, सुवर्णा, जोरदार, वाय.एस.आर, मसुरी, एककाडी, गुजरात ११, गुजरात १३, वाडा झिनिया, रत्नागिरी-७, रत्नागिरी-८, रत्ना, जया, कर्जत आदी भातांच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतात.

मजुरांची टंचाई
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍‌या वाडा तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या होती. पण १९९५ पासून या तालुक्यात उद्योगधंदे आल्यामुळे येथील मजूर उद्योगधंद्यात कामाला लागले आहेत. शिवाय बांधकामासाठी शहरात व नदी, खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्यासाठी शेकडो मजूर जात असल्याने मजुरांची टंचाई जाणवते.
भातशेतीसाठी पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्याने भातपिकाची लागवड करायची कशी, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे येथील भातशेती संकटात सापडली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88558 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top