नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विविध पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विविध पर्याय
नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विविध पर्याय

नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विविध पर्याय

sakal_logo
By

पनवेल, ता. ११ (बातमीदार) : नवीन शैक्षणिक धोरणांमुळे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. ज्या क्षेत्रात जाणार आहोत, त्या क्षेत्रातील कोणत्या आव्हानांना सामोरे जायचे आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे. आयुष्यात मार्गदर्शन करणारे खूप असतात, मात्र आपण कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे हा निर्णय महत्त्वाचा आहे, असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ रायगड विभागाच्या वतीने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘भरारी २०२२’ हे करिअर मार्गदर्शन शिबिर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. यशस्वी होण्यासाठी हुशार असावे लागत नाही, तर कष्टाळू असणे गरजेचे आहे, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. शिवव्याखाते, लेखक व करिअर मार्गदर्शक प्रशांत देशमुख यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्यातून जगण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा घ्यावी असे सांगितले. शिबिरासाठी वरिष्ठ समन्वयक दीपक पाटेकर, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत, मंगेश जाधव, सिद्धेश गोसावी आदी उपस्थित होते. या वेळी दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88566 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..