एकता पॅनलचा प्रचंड मतांनी विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकता पॅनलचा प्रचंड मतांनी विजय
एकता पॅनलचा प्रचंड मतांनी विजय

एकता पॅनलचा प्रचंड मतांनी विजय

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : महाराष्ट्र मंत्रालय क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळ निवडण्यासाठी ८ जुलै रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकता पॅनेलचा विजय झाला. राज्यभरातील सहा केंद्रांवर २,९०० सभासदांनी मतदानाचा अधिकार बजावत एकता पॅनेलच्या गळ्यात विजयाची माळ घातली. या निवडणुकीत एकता पॅनेलतर्फे कोकण भवनमधील नगर रचना कार्यालयातील माजी सैनिक अजित न्यायनिर्गुणे हे विजयी झाले आहेत. राज्यात मुसळधार पावसाचे वातावरण असताना ६५ टक्के सभासदांनी मदतान केले. मागील ३५ वर्षांपासून या संस्थेची निवडणूक न झाल्याने या सोसायटीवर सहकार पॅनेलच्या संचालक मंडळाचे एकतर्फी वर्चस्व निर्माण झाले होते. त्यामुळे राज्यभरातील विविध शाखेतील अनुभवी १५ सहकारी सदस्यांनी एकत्र येऊन एकता पॅनेल तयार केले होते. तसेच त्यांनी सहकार पॅनेलसमोर आव्हान उभे केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88569 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top