झाड पडल्‍याने वाहतूक खोळंबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाड पडल्‍याने वाहतूक खोळंबली
झाड पडल्‍याने वाहतूक खोळंबली

झाड पडल्‍याने वाहतूक खोळंबली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : कळवा, खारेगाव नाका, येथे राजदीप हॉटेलसमोर रस्त्यावरती झाड पडल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरण, टोरंट विद्युत, कळवा वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दल हे विभाग दाखल झाले. या घटनेत रस्त्याकडेला उभ्या केलेल्या एका चारचाकी वाहनावर ते झाड पडल्याने त्या गाडीचे नुकसान झाले. त्यातच, ते झाड ठाण्याकडून मुंब्र्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पडल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. तसेच रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरण आणि अग्निशमन या तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कापून बाजूला केले. त्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88579 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top