भिवंडीत उड्डाणपूलाखाली सांडपाण्याचे फवारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत उड्डाणपूलाखाली सांडपाण्याचे फवारे
भिवंडीत उड्डाणपूलाखाली सांडपाण्याचे फवारे

भिवंडीत उड्डाणपूलाखाली सांडपाण्याचे फवारे

sakal_logo
By

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : कल्याण व ठाणे या मुख्य मार्गावर असलेल्या स्व. राजीव गांधी उड्डाणपूल व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल या दोन्ही पुलांच्‍या खालील बाजूस पुलावरील सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन आहे. ती ठिकठिकाणी फुटलेली असल्याने त्‍यामधून पावसाळ्यात खाली जाणाऱ्या वाहनचालकांवर पाणी पडत असल्याने पादचारी व पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत. महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून उड्डाणपुलावरून खाली पडणारे पाणी बंद करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी उपमहापौर ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी केली आहे. भिवंडी ठाणे महामार्गावरील स्व. राजीव गांधी उड्डाणपूल तब्बल चार महिने बंद ठेवून पुलावरील रस्त्याची दुरुस्ती महापालिकेच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्‍यात आला, परंतु या उड्डाणपुलावरील जमा होणारे पाणी निचरा होण्यासाठी असणारी पाईपलाईन दुरुस्त केली नाही. त्यामुळे या पुलाखालील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकासह पादचाऱ्यांच्‍या अंगावर पावसाळ्यात पाण्याचे फवारे सुरू असतात.
---
कोट
उड्डाणपुलावरील माती व ऑईलमिश्रित सांडपाणी अंगावर पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालावे.
- मनोज काटेकर, नगरसेवक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88586 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..