युरिया खताचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युरिया खताचा तुटवडा
युरिया खताचा तुटवडा

युरिया खताचा तुटवडा

sakal_logo
By

युरिया खताचा तुटवडा
पालघर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल; कृषी सेवा केंद्रावर रांगा
प्रसाद जोशी
वसई, ता. ११ (बातमीदार) ः भातशेतीसाठी जरी समाधानकारक पाऊस असला, तरी शेतीसाठी लागणारे युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी झाली आहे. कृषी सेवा केंद्रात खत मिळावे, याकरिता रांगा लागत आहेत; मात्र पुन्हा रिक्त हाती माघारी फिरावे लागत असल्याची अवस्था पालघर जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
पालघर जिल्ह्यात वाडा, मोखाडा, विक्रमगड, बोईसर, सफाळे, पालघर, बोर्डी, केळवे, वसई, डहाणूसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड शेतकरी करतात. नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात त्यामुळे शेतीचे नुकसान होत असते व आर्थिक फटका बसतो; मात्र यंदाचा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असा पडल्याने शेतकरी आनंदी आहे. मात्र खत मिळत नसल्याने त्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. पीक चांगले यावे म्हणून खताचा वापर केला जातो; परंतु काही दिवसांपासून मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा झाला नाही. अतिशय कमी प्रमाणात खतपुरवठा होत असल्याने अडचणी येत आहेत. कृषी विभागाकडून याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जात असला, तरी पावसाळ्यात शेतीच्या कामांसाठी लागणारे खत वेळेवर मिळत नसल्याने शेती करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. जिल्ह्यात युरिया वापराचे प्रमाण अधिक आहे.

आमदारांची कृषी केंद्रावर धडक
युरिया खत मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार राजेश पाटील यांच्याकडे आल्यावर त्यांनी थेट कृषी सेवा केंद्रावर धडक दिली. या वेळी कृषी अधिकाऱ्यांना खताचा पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आदेश या वेळी देण्यात आले.

खत नसल्याने सुपीक भातशेतीला अडचणी येत आहेत. पालघर जिल्हा शेतीप्रधान आहे. येथील शेतकरी दरवर्षी भात उत्पादनातून उत्पन्न घेत असतो. खताचा तुडवडा जाणवू नये, याकरिता शासकीय स्तरावरदेखील चर्चा करून यातून मार्ग काढणार आहोत.
– राजेश पाटील, आमदार

एकीकडे अनेक नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशातच शेतीसाठी लागणारे खत उपलब्ध नसल्याने भविष्यात अशाच अडचणी येत राहिल्या, तर शेती करायची की नाही, ही चिंता उद्भवणार. कृषी विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेत युरियाचा साठा शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा.
– राम पाटील, अध्यक्ष, वसई तालुका ग्रामीण, काँग्रेस

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88594 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top