वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटप
वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटप

वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटप

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : ऊन, पाऊस, वारा याची पर्वा न करता घरोघरी वृत्तपत्र पोहचविणाऱ्या गिरणगावातील वृत्तपत्र विक्रेत्यांना पावसापासून संरक्षण व्हावे, या हेतूने जागृती मंचच्या वतीने रेनकोटवाटप करण्यात आले. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना पावसाचा एकही थेंब न पडलेले वर्तमानपत्र वेळेत घरी पोहोचविण्याचे काम हे विक्रेते पार पाडतात, म्हणूनच अशा कर्तव्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट देण्यात आले. या वेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर, प्रकाश गिलबिले, जीवन भोसले व शंकर रिंगे यांच्‍यासह जागृती मंचचे अध्यक्ष राम साळगावकर, डॉ. प्रागजी वाझा, निरंजन नलावडे यांच्या उपस्थितीत हे रेनकोट वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88598 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..