एकाच पावसात उरणमधील रस्त्यांची चाळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच पावसात उरणमधील रस्त्यांची चाळण
एकाच पावसात उरणमधील रस्त्यांची चाळण

एकाच पावसात उरणमधील रस्त्यांची चाळण

sakal_logo
By

उरण, ता. ११(वार्ताहर) ः उरण तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. एकाच पावसात चाळण झाल्‍याने रस्त्यासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी खड्ड्यात गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.
उरण तालुका हा सखल विभाग असलेला तालुका आहे. पूर्व विभागात डोंगरपट्टा व पश्चिम विभागात खाडीपट्टा अशी भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या तालुक्यात रस्त्यांचे मोठे जाळे पसरले आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच जेएनपीए बंदराच्या अवजड वाहतुकीचा भार येथील रस्त्यांवर पडला जातो. त्यामुळे उरण तालुक्यातील रस्त्यांवर दरवर्षी सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जेएनपीएमार्फत कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र निकृष्‍ट कामामुळे हा खर्च वाया जात असून खड्डेमय रस्‍त्‍यांतूनच नागरिकांसह चालकांना वाट काढावी लागते.
दिघोडे दास्तान फाटा, कोप्रोली-खोपटा-उरण, उरण-पनवेल असे जेएनपीएकडे जाणारे रस्ते, बीएमसीटी बंदराकडे जाणाऱ्या पुलावर खड्डे पडले आहेत. सिडकोच्या द्रोणागिरी विभागातील रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडल्‍याने चिखल मिश्रित पाणी साचले आहे. गेल्‍या काही वर्षात उरण परिसरात झालेल्‍या वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत हजारांहून अधिकांचा बळी गेला आहे. तर अनेकांना अपंगत्‍व आले आहे.
उरण तालुक्यात जेएनपीएच्या बंदरामुळे शेकडोंच्या संख्येत गोदामे उभी राहिली आहेत. याठिकाणी माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्‍याने रस्‍त्‍यांची दैनावस्‍था झाली आहे. हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी कोट्यवधींचा निधी सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग जेएनपीटी, राष्‍ट्रीय महामार्ग विभागाकडून खर्च केला जातो. त्यातच या विभागातील अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारालाच कंत्राट देऊन खड्‌डेमय रस्त्यांवर तकलादू मलमपट्टी केली जात आहे.

दरवर्षी रस्ते बुजवले जातात आणि पुन्हा उखडतात. निकृष्‍ट कामामुळे नागरिकांसह चालकांना त्रास सहन करावा लागतो. संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दर्जेदार कामाकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे दिसते.
सत्‍यवान भगत, तालुका अध्यक्ष, मनसे

ज्या ठेकेदाराने रस्त्यांची कामे केली आहे आणि ती लवकर खराब झाली आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्‍या रस्‍त्‍यावर खड्‌डे पडले आहेत, ते बुजवण्याची कामे सुरू आहे. पाऊस थांबल्‍यावर डांबरीकरण करण्यात येईल.
- नरेश पवार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88605 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..