
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदरच
वाशी, ता. ११ (बातमीदार) : शिवसेनेमध्ये मागील साडेसात वर्षांपासून कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना पदवाटप करण्यात आलेले नाही. कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या अडचणींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. एकनाथ शिंदे हे नक्कीच कार्यकर्त्यांना न्याय देतील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर असून त्यांच्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोलणार नाही. त्यांनी कितीही टीका केली, तरी आम्ही बोलणार नाही, असे ते म्हणाले.
नाहटा यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे विजय नाहटा यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली; पण शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेली कारवाई नाहटा यांच्या जिव्हारी लागली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी खंत व्यक्त केली. अनेक वर्षांपासून शिवसेनेमधील कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना पददेखील मिळालेली नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांभाळल्यामुळे आज ते त्यांच्यासोबत आहेत. पक्षासाठी काम केल्यानंतर पक्ष सोडल्यामुळे हक्कालपट्टी हा शब्द वापरणे योग्य नाही. कोणाबरोबर काम करायचे आहे, हा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. जो शिवसैनिक माझ्याकडे कामासाठी येईल, त्यांचे मी काम करणार आहे, असेही नाहटा म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88612 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..