
दृष्टीक्षेप ३
बोरिवलीत जॉगर्स पार्कमध्ये आषाढी एकादशी
कांदिवली (बातमीदार) ः बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडी जॉगर्स पार्कमध्ये सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक आमदार सुनील राणे यांच्या हस्ते विठ्ठलाचे पूजन करून दिंडी काढण्यात आली. चिकूवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रविवारी सकाळी ७ वाजता आमदार सुनील राणे यांनी विठ्ठल-रखुमाईचे पूजन केले. विठ्ठलनामाच्या गजरात पारंपरिक वेषात, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात भगवे झेंडे घेऊन परिसरात दिंडी काढण्यात आली.
कांदिवली चारकोप सह्याद्री नगरमध्ये सोहळा
कांदिवली (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील सह्याद्री नगर माथाडी कामगारांच्या सर्वांत मोठ्या वसाहतीमध्ये आषाढी एकादशी भव्य दर्शन सोहळा मोठ्या भक्तिभावाने झाला. नगरामध्ये काढण्यात आलेल्या दिंडीत पारंपरिक वेषात पखवाज, टाळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. गणेश मंदिर ट्रस्ट व सह्याद्री नगर प्रगती मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून एकादशीच्या निमित्ताने गेली १५ वर्षे भव्य रथयात्रा निघते. पहाटे ५ वाजता चंद्रशेखर चव्हाण, सुनील किर्वे, परशुराम कदम, राजेंद्र देसाई, मोहन शिंदे यांना अभिषेक करण्याचा मान मिळाला. या सोहळ्यास स्थानिक आमदार योगेश सागर, नगरसेवक बाळा तावडे, विविध संस्था पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88613 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..