पामबीच मार्गावर कारचा भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पामबीच मार्गावर कारचा भीषण अपघात
पामबीच मार्गावर कारचा भीषण अपघात

पामबीच मार्गावर कारचा भीषण अपघात

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : पाम बीच मार्गावर सोमवारी दुपारी भरधाव कारच्या झालेल्या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात कार दुभाजकावर जोरदार आदळली असून चक्काचूर झाली आहे.

पामी बच मार्गावर सोमवारी दुपारी एक कार भरधाव वेगाने येत दुभाजकावर आदळल्याची घटना घडली. टी. एस. चाणाक्य चौकातून सीबीडीच्या दिशेने ही कार जात होती. या वेळी कारचालकाने अक्षर चौकातून यू टर्न घेत तो वेगाने वाशीच्या दिशेने जाण्यास निघाला होता; मात्र या वेळी कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार दुभाजकावर जोरदार आदळली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एनआरआय पोलिस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88647 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..