धारावीत रस्त्यांवर कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत रस्त्यांवर कचरा
धारावीत रस्त्यांवर कचरा

धारावीत रस्त्यांवर कचरा

sakal_logo
By

धारावी, ता. १२ (बातमीदार) : पावसाळ्यामुळे विविध प्रकारच्या साथीचे रोग वाढत चालले आहेत. धारावीतही साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. स्वच्छता होत नसल्याने त्यात भर पडत चालली आहे. धारावीतील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. पावसाच्या पाण्यात कचरा सडत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना मुठीत नाक धरून जावे लागत आहे; तर दुर्गंधीमुळे स्थानिकांना घराची दरवाजे, खिडक्या बंद ठेवावी लागत आहे. याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे. लहान मुले व रहिवासी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते आहे. वेळेवर कचरा उचलला जावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88665 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..