उघड्यावरील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघड्यावरील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात
उघड्यावरील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

उघड्यावरील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By

वाशी, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. मात्र कचराकुंड्या कमी करण्यात आलेल्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे कचरा ओला होत असल्याने त्यातून दुर्गंधी येत असून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ११०० ठिकाणी सार्वजनिक कचराकुंड्या होत्या. पालिकेलादेखील शून्य कचराकुंडी करण्याचे विचाराधीन आहे. त्यानुसार या कचराकुंड्या स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या कमी करण्यात आलेल्या ठिकाणी फलकदेखील लावले आहेत. तसेच काही ठिकाणी सुशोभीकरणदेखील करण्यात आले आहे. कचराकुंडीच्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत होती; मात्र आता कारवाई थंडावल्यामुळे नागरिकांनी पुन्हा कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील ११०० ठिकाणी असणाऱ्या कचराकुंड्या कमी करत सद्यस्थितीत कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणाहून हटवण्यात आल्यानंतर कचरा उघड्यावरच टाकण्यात येत आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालकांना दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे; तर भटकी जनावरेदेखील कचरा विस्कटून टाकत असल्याने घाणीचे साम्राज्य आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे.


स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या अनुषंगाने पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर केले आहे. कचराकुंडी हटविल्या त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. कचराकुंडी हटवलेल्या ठिकाणी पालिकेच्या कचऱ्याची गाडी ही वेळेनुसार येत असते. त्याच वेळी कचरा टाकणे अपेक्षित आहे. नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.
- अभिजित बांगर,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88670 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..