पोलिस ठाण्याच्या आवारातील झाड धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस ठाण्याच्या आवारातील झाड धोकादायक
पोलिस ठाण्याच्या आवारातील झाड धोकादायक

पोलिस ठाण्याच्या आवारातील झाड धोकादायक

sakal_logo
By

किन्हवली, ता. १२ (बातमीदार) : पोलिस ठाण्याच्या अधिकारी निवासस्थानावर झाड कोसळण्याच्या अवस्थेत झुकले आहे. हे निवासस्थान जुने असल्याने या ठिकाणी कोणाचेही वास्तव्य नसले, तरी झाड कोसळून वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
किन्हवली पोलिस ठाण्याच्या आवारातील अधिकारी निवासस्थानाच्या मागील बाजूस असलेले बाभळीचे उंच झाड अतिवृष्टीमुळे मुळापासून उखडले आहे. ते अधिकारी निवासस्थानावर कोसळण्याच्या अवस्थेत झुकले असून, ते कोसळल्‍यास वित्तहानी होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी झाडाखालून जाणाऱ्या विद्युत वाहक तारा बाजूला हटविल्या आहेत. कोसळण्याच्या अवस्थेतील झाड तोडण्यासाठी मजूर उपलब्ध झालेले आहेत. मात्र, सध्‍या अतिवृष्टीमुळे कामात अडथळा निर्माण झाला असल्‍याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88680 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..