डोंबिवलीत बँक कर्मचाऱ्यांकडून साडेतीन कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत बँक कर्मचाऱ्यांकडून साडेतीन कोटींची फसवणूक
डोंबिवलीत बँक कर्मचाऱ्यांकडून साडेतीन कोटींची फसवणूक

डोंबिवलीत बँक कर्मचाऱ्यांकडून साडेतीन कोटींची फसवणूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : बॅंकेत ग्राहकांनी ठेवलेल्या बचत ठेवीवर ओव्हर ड्राफ्ट सवलत घेत बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी बॅंकेची व ग्राहकांची तब्बल साडेतीन कोटीला फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली पूर्वेतील आयसीआयसीआय बॅंकेत ही फसवणुकीची घटना घडली असून बॅंकेचे क्षेत्रीय प्रमुख पवन माळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर आशिष याख्मी व त्याच्या इतर साथीदारांवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेत आयसीआयसीआय बॅंकेची एमआयडीसी शाखा आहे. या बॅंकेत रिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करणारे आशिष याख्मी व त्याच्या साथीदारांनी ग्राहकांनी गुंतवणुकीसाठी दिलेल्या धनादेशावर खाडाखोड करून खोट्या सह्या करत पैसे काढून साडे तीन कोटीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88707 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top