पावसामुळे घर कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे घर कोसळले
पावसामुळे घर कोसळले

पावसामुळे घर कोसळले

sakal_logo
By

खर्डी, ता. १२ (बातमीदार) ः गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खर्डी येथील एका घराच्या भिंती कोसळल्या. या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था समाजमंदिरात करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक वाडू यांच्या घराच्या खालील भाग खचल्याने घराच्या दोन भिंती पूर्णपणे कोसळल्या. घर कोसळल्याने त्यांचे कुटुंब उघडे पडले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शाखाप्रमुख अनिल मडके यांनी तात्काळ त्यांची जवळच्या समाजमंदिरात राहण्याची व्यवस्था करून दिली. तसेच त्यांना किराणा सामानाची व आर्थिक मदत केली आहे. अशोक वाडू यांना घरबांधणीसाठीसुद्धा ते साहित्य देणार असल्याचे मडके यांनी जाहीर केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88720 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..