आत्महत्या करण्यापासून रोखल्यानेच आईची हत्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या करण्यापासून 
रोखल्यानेच आईची हत्या!
आत्महत्या करण्यापासून रोखल्यानेच आईची हत्या!

आत्महत्या करण्यापासून रोखल्यानेच आईची हत्या!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुलुंडच्या वर्धमाननगर येथील एका २२ वर्षीय मुलाने आईची हत्या करून लोकलपुढे उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (ता. ९) घडली होती. सकाळच्या सुमारास आरोपी जयेशने गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच आईने रोखल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यावरून दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात त्याने आईची हत्या केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली.
आर्थिक विवंचनेमुळे नैराश्यात असलेल्या वर्धमाननगर येथील जयेश पांचाळ (वय २२) या तरुणाने शनिवारी आईची हत्या करून लोकलपुढे उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांना त्यांच्या घरात गुजराती भाषेतील सुसाईड नोट सापडली. तसेच वडिलांकडे चौकशी केली असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. घटनेच्या दिवशी जयेशने स्वयंपाकघरातील पंख्याला दुपट्टा बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. नेमके त्याच वेळी तिथे आलेल्या त्याच्या आईने त्यास रोखले; मात्र आत्महत्या करण्यास का रोखले, यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. रागाच्या भरात जयेशने धारदार शस्त्राने गळा चिरत आईची हत्या केली. त्यानंतर अंघोळ करून रेल्वे स्थानकावर जात आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या जखमी असेलला जयेश बेशुद्धावस्थेत आहे. त्यामुळे या माहितीची पुष्टी करण्यासाठी पोलिस त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88724 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top