मुंबई पालिकेत आठ हजार शिक्षकांची भरती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eight thousand teachers recruited in Mumbai Municipal Corporation
मुंबई पालिकेत आठ हजार शिक्षकांची भरती!

मुंबई पालिकेत आठ हजार शिक्षकांची भरती!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एक लाख दोन हजार नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. याद्वारे पालिका शाळेत गेल्या दशकभरात सर्वाधिक प्रवेशाचा विक्रमही नोंदला गेला. एकीकडे सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश झाले असले, तरी दुसरीकडे शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कारण पालिका शाळेत शिक्षकांच्या सुमारे ८०० जागा रिक्त असून, शिक्षकांच्या निवृत्तीनंतर त्या अद्याप भरलेल्या नाहीत. या जागा भरण्यासाठी पालिका पुढाकार घेण्याच्या तयारीत असून, याबाबतचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका शाळेत गेल्या शैक्षणिक वर्षात २९ हजार नवे प्रवेश झाले होते. तुलनेत यंदाच्या वर्षी एक लाख दोन हजार नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. पालिकेने ‘मिशन एक लक्ष’चे उद्दिष्ट यंदा पूर्ण केले आहे. त्यामुळेच यंदा वाढलेली विद्यार्थीसंख्या आणि शाळेतील पट या तुलनेत शिक्षकांचीही गरज भासणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी ८०० जागांवर पालिकेने तासिका तत्त्वावर हंगामी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे, पण पालिकेतील मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा शिल्लक असल्याने ही भरती प्रक्रियाही शिक्षण विभागाला पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळेच पालिका येत्या दिवसांत कायमस्वरूपी शिक्षक भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहे.

सध्याची पालिका शाळांमधील कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्य सरकारला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. मुंबई पालिकेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यामुळे मदतच होईल.
- अजित कुंभार, सहआयुक्त, शिक्षण विभाग, मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88739 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top