आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली
आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली

आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १२ ः कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली झाली असून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती आयुक्तपदी करण्यात आली आहे. आयुक्त सूर्यवंशी यांनी अडीच वर्षांचा कालावधी केडीएमसीमध्ये पूर्ण केला आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या कोरोना काळातील कामगिरीमुळेच कल्याण डोंबिवली महापालिकेला कोव्हिड इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी करत राज्य सरकारने फेब्रुवारी २०२०मध्ये आयुक्त पदाची धुरा डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर सोपवली. डॉ. विजय सूर्यवंशी हे २०१०च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शहरातील रखडलेला कचरा प्रकल्प, निधीअभावी खोळंबलेली विकासकामे, शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेली पालिका निवडणूक, सर्वोच्च न्यायालयाने बांधकामांवर घातलेली बंदी यांसारख्या गंभीर विषयांवर आयुक्त सूर्यवंशी यांना निर्णय घ्यायचे होते. परंतु कोरोना संसर्गाची लाट आली आणि आयुक्तांसमोर एक वेगळेच आव्हान उभे ठाकले. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक त्यात शहरातील आरोग्य यंत्रणा कमकुवत होती. ही कमतरता भरुन काढत आजच्या घडीला कल्याण डोंबिवली महापालिकेत एक बळकट अशी आरोग्य यंत्रणा उभी राहिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88764 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..